एरंडोल येथे क्रीडा प्रबोधिनीतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेचा समारोप

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथे जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात जिल्ह्यातील 22 कबड्डी संघानी सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रथम स्थानी कैलास क्रीडा मंडळ जळगाव, द्वितीय स्थानी क्रिडा प्रबोधनी एरंडोल व तृतीय स्थानी स्वामी स्पोर्ट्स रावेर या संघांनी विजय मिळवला.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व विजयी संघांना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, विशाल तिवारी यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी नितीन बर्डे नगरसेवक तथा सचिव जिल्हा कबड्डी असोसिएशन, राकेश चौधरी अध्यक्ष क्रीडा प्रबोधिनी, उपाध्यक्ष डॉ. राहुल वाघ, उपाध्यक्ष सचिव दीपक तायडे, प्रमोद महाजन, गणेश भोई , विजय मराठे, भूषण सुरडकर, महेश महाजन, दर्शना तिवारी, आरती ठाकुर अध्यक्षा ग्राहक कल्याण फाउंडेशन एरंडोल, मुख्याध्यापिका रोहिणी मानधने तसेच कबड्डी प्रेमी, एरंडोल तालुका पत्रकार संघ, युवा वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर कबड्डी स्पर्धेचे आयोजन प्रबोधनी यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यासाठी क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक दीपक वाडिले व मनीष ठाकुर यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -