fbpx

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिपिकाला अडीच हजारांची लाच भोवली

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युएटीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात व अर्जित रजाची येणारी रक्कम जमा करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज, वय-३९, रा.मदिना कॉलनी, रावेर याने दि.११ रोजी रावेर येथील तक्रारदाराला त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग, रावेर येथुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहे. त्याच्या ग्रॅज्युएटीची ३ लाख ९१ हजार ७१० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात २ हजार व अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ५०० अशी एकूण २५०० रुपये  लाचेची मागणी आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष केली होती. पथकाने आज सापळा रचून लिपिकाला रंगेहाथ अटक केली.

या पथकाने केली कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, सफौ.दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे,  पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी,  पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पोकाॅ.महेश सोमवंशी यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज