fbpx

रुग्ण झाले कमी ; जीएमसीमध्ये साफसफाई, निर्जंतुकीकरण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व वार्डात व परिसरात सोमवारी २४ मे रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले.

राज्य शासनाने करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे जिल्हाभरामध्ये कोरोना महामारी आता कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील सोमवारी २४ मार्च रोजी सुमारे १८० खाटा ह्या रिक्त झाले आहेत. त्यामुळे सर्व वॉर्डमध्ये साफसफाई करण्यात आली. तसेच परिसर निर्जंतुकीकरण देखील करण्यात आला. एस.एम.एस संस्थेचे सफाई व  कंत्राटी कामगार,  चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगार यांनी यात सहभाग घेतला.

निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करीत असताना एसएमएस कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निरीक्षक अजय जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी मंगेश बोरसे,  सफाई कामगारांचे प्रतिनिधी जितेंद्र करोसिया यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करून स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित आदींचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज