जे.टी. महाजन स्कूलमध्ये स्वच्छता अभियान; ४२ किलो कचरा संकलित

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । फैजपूर येथील जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात ४२ किलो प्लास्टीक व इतर कचरा संकलित करण्यात आला.

भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र, जळगाव यांच्यातर्फे जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा ‘स्वच्छ भारत अभियान’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मोझेस प्रकाश जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखपाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका समन्वयक तेजस पाटील व पल्लवी तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाजन स्कूलचे प्राचार्य जाधव, नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक पल्लवी तायडे, जयमाला चौधरी, डिगंबर चौधरी, राहुल फुकटे, प्रतीक वारके, विनोद कोल्हे यांच्यासह शाळेतील कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज