२६ वर्षांनी एकत्र आले वर्गमित्र, शाळेत रंगला माजी विद्यार्थी मेळावा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय व तत्कालीन न्यू इंग्लिश स्कूलमधील १९९४-९५ या वर्षी इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग रविवारी पुन्हा भरला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन, स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मित्रांनी २६ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा दिला.

यांची उपस्थिती होती 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष भावना बडगुजर, सेवानिवृत्त शिक्षक एन.एफ. बडगुजर, पी.के. चांदा, अशोक बडगुजर, डी.डी. पाटील, मुख्याध्यापक आर.व्ही. गवळी, एस.पी. चौधरी, पर्यवेक्षक एस.डी. वाघ उपस्थित होते.

दरम्यान, मेळाव्यास उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आठवणी सांगितल्या. आता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, भविष्यात पुन्हा सर्वांनी एकत्र यावे, असा मानस व्यक्त करून सर्वांनी आपला परिचय करून दिला. मनसोक्त गप्पा मारल्या. एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविषयी माहिती दिली. सध्या कोण काय नोकरी, व्यवसाय करतोय, याबाबत सांगितले. यावेळी भरीत, पुरी व गुलाबजाम या स्नेहभोजनचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले. नरेंद्र गांधेले यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज