fbpx

जळगावात आजपासून गाळेधारकांच्या साखळी उपोषणाला सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । जळगाव शहरातील १६ व्यापारी संकुलातील गाळेधारक आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहेत. महापालिकेने गाळे लिलावाच्या दिशेने सुरू केलेली वाटचाल लक्षात घेता गाळेधारकांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मंगळवारी सकाळी ११.३० वाजेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.  

महापालिका आणि गाळेधारक हा संघर्ष गेल्या ८ वर्षांपासून सुरू आहे. पालिका प्रशासनाने ही लढाई आता निर्णायक वळणावर आणून ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राज्य शासनाने कायद्यात केलेली दुरुस्ती लक्षात घेता नूतनीकरण करणे तसेच पात्र नसलेल्या गाळेधारकांच्या ताब्यातील गाळा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने गाळेधारकांकडील थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यास गाळेधारकांचा विरोध होत आहे. लाखोंची बिले भरण्यास गाळेधारक तयार नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाची परवानगी घेतली आहे.

गाळेधारक संघटनेतर्फे पिंप्राळा येथील स्वामी समर्थ मंदिरात पूजा करून आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यात पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ हे तर दुसऱ्या टप्प्यात संजय पाटील, पंकज मोमया, वसीम काझी, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. परवानगीनुसार दररोज वेगवेगळ्या मार्केटचे ५ जण साखळी उपोषणासाठी उपस्थित राहतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज