आयुध प्रदर्शनात शस्त्र साहित्य पाहून नागरिक भारावले‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । वरणगाव‎ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये १३ ते‎ १९ डिसेंबरपर्यंत शस्त्र साहित्य‎ प्रदर्शनाचे आयोजन केले होते.‎ यावेळी विद्यार्थी व नागरिक मिळून ७ जाहीर जणांनी भेट दिली. ‎स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त‎ आयाेजित या सात दिवसीय‎ प्रदर्शनाचा रविवारी समाराेप झाला.‎

ऑर्डनस फॅक्टरीच्या कम्युनिटी‎ हॉलमध्ये आयोजित या प्रदर्शनात‎ देशभरातील ॲम्युनेशन इंडिया‎ लिमिटेड गटातील विविध आयुध‎ निर्माणींमध्ये बनवलेले सर्व प्रकारचे‎ दारूगोळे, मार्टर बाॅम्ब, रायफल,‎ काडतुसे, शेल, स्मोक, सिग्नल,‎ रॉकेट व वरणगाव आयुध निर्माणीत‎ बनवल्या जाणाऱ्या ५.५६,७.६२ व‎ १२.७ एमएम या ऑम्युनेशन‎ ‎बंदुकीच्या गोळ्या पाहण्यासाठी‎ ठेवल्या होत्या. सोबत कॅटलाॅगवर ‎माहिती उपलब्ध होती. फायर‎ ब्रिगेडची उपकरणे व त्याबद्दल‎ माहिती प्रात्यक्षिकानुसार सांगितली‎ जात होती.‎ वरणगाव फॅक्टरी येथे निर्माणीचे ‎महाप्रबंधक पी.सी.नंदा, नोडल ‎ऑफिसर ए.के.वसू व व्ही.व्ही. ‎ ‎ वासनिक यांच्या मार्गदर्शनात‎ आयोजित प्रदर्शनाला जिल्ह्यातील ‎विविध शाळांमधील विद्यार्थी,‎आदींसह ७ हजारांवर नागरिकांनी‎ भेट दिली. विशेष म्हणजे या‎ प्रदर्शनात दुसऱ्या फॅक्टरींमध्ये‎ निर्मित उत्पादनांची माहिती योग्य‎ पद्धतीने करून देण्यात आली.‎

प्रदर्शन यशस्वितेसाठी आयुध‎ निर्माणीचे कनिष्ठ कार्य प्रबंधक‎ एन.एन.गायकवाड, सचिन कांबळे,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎मनोहर लोणे, अमोल पाटील,‎ व्ही.के.कोल्हे, प्रदीप पाटील, गणेश‎ टेमकर, टी.जी. पिल्ले, के.बी.‎ इंगळे, एन.पी.वाघ, आर.बी.‎जगताप, सचिन सोनार, सोमू प्रधान,‎ मिलिंद पाटील, अंबादास भलभले,‎ ‎संजय निकम, फायर ब्रिगेड‎ विभागाचे कांबळे, माणिक धाबर्डे,‎ हेमंत जोशी, डेनिस, शरद चौहान,‎ दीपक सुरवाडे, महेंद्र पाटील, डी.ए.‎देवरे, जॉन टेन्ट यांचे सहकार्य‎ लाभले.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -