fbpx

महावितरणने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी हरीविठ्ठल येथील नागरिकांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । वीज बिल न भरल्याने महावितरणने नागरिकांविरुद्ध तक्रार केली असून महावितरण ने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी हरीविठ्ठल येथील नागरिकांनी आज अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथित केला.

मागिल वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वच लॉकडाऊन असल्याने गोरगरीब जनतेची आर्थीक परिस्थिती खचलेली आहे.  त्यामुळे वीज बिल भरणे त्यांना शक्य नाही यात वीज बिल न भरलेल्या नागरिकांची महावितरणने तक्रार केल्याने हतबल झालेल्या हरीविठ्ठल येथील नागरिकांनी अजिंठा शासकीय विश्रामगृह गाठत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत आपली व्यथा मांडली.

mi advt

यावेळी नागरिकांनी महावितरणने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले पालकमंत्री यांनी लागलीच रामानंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर याच्याशी फोन वरून संवाद साधत कोरोना महामारी मुळे 2 ते 3 महीने या विषयावर महावितरण अभियंता यांच्या शी चर्चा करून मार्ग काढला जाणार आहे. तुम्ही नागरिकांना त्रास देऊ नका पालकमंत्री यांनी नागरिकांची बाजू मांडल्याने नागरिकांचे समाधान झोले.

यावेळी खंडेराव महाले यांचासह. मोतिलाल माधव, कुमावत, रवि रघूनाथ भामरे, बापू काशिनाथ महाले, किरण भागवत पाथरे, योगेश नरहरी कदम, पाडूरग बाबूराव बारी, संतोष भटू महाजन, नारायण बूधा माळी, प्रकाश बूधा महाजन,छटु त्रबक, नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज