केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात 12वी पाससाठी मोठी पदभरती, पगार 81,100

बातमी शेअर करा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force Recruitment 2022)तर्फे हेड कांस्टेबल या पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे.

पदाचे नाव :

1) हेड कांस्टेबल – जनरल ड्यूटी (Head Constable)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी नॅशनल लेव्हल किंवा स्टेट लेव्हलला स्पोर्ट्समध्ये प्राविण्य मिळवणं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

या पदांसाठीच अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

  • ही भरती केवळ गुणवंत खेळाडूंसाठी आहे जे एकतर पदक विजेते/पदावर आहेत
  • नियुक्तीसाठी निवडलेले उमेदवार भारतीय प्रदेशात कोठेही सेवा करण्यास तत्पर असणं महत्त्वाचं आहे.
  • CISF ने कोणतीही नियुक्ती न करता भरती रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

इतका असेल पगार

हेड कांस्टेबल – जनरल ड्यूटी (Head Constable) – 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022

Notification : PDF

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -