fbpx

यावल तालुक्यातील चुंचाळे, बोराळेत ढगफुटी, २०० घरांमध्ये शिरले पाणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जून २०२१ ।  यावल तालुक्यातील पश्चिम भागातील चुंचाळे, बोराळे गावात सोमवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसात वाजेदरम्यान ढगफुटी सदश्य पाऊस झाला. त्यात परिसरातील तीन नाल्यांना पूर आल्याने गायरान व चुंचाळे प्लॉट भागातील २०० पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरले. दोन दुचाकी वाहून गेल्या. एका ठिकाणी वीज पडून बैलजोडी ठार झाली.

सोमवारी सायंकाळी यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली. त्यात चुंचाळे, बोराळे व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान भागात ढगफुटी सदश्य पाऊस झाला. दोन तास तुफान वेगात सरी बरसल्या. बोराळे गावात वीज पडून सुरेश प्रल्हाद धनगर यांची १ लाख १० हजार रुपयांची बैलजोडी ठार झाली. या घटनेत प्रत्यक्षदर्शी विनोद वानखेडे हे थोडक्यात बचावले.

तसेच परिसरातील तीन नाल्यांना पूर आल्याने चुंचाळे या गावात संजयसिंग राजपूत व रमेश धनगर या दोघांच्या दुचाकी वाहून गेल्या. गायरान व चुंचाळे प्लॉट भागातील सुमारे २०० पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचे पाणी शिरून एकच दाणादाण उडाली. रात्री उशिरापर्यंत गायरान भागातील वस्ती, चुंचाळे व बोराळे या गावांचा एकमेकाशी संपर्क तुटला होता. मात्र, उशिराने पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज