fbpx

श्रीमंत लोकांची नावे कमी करून गोरगरीब लाभार्थ्यांची निवड करा : आ. चिमणराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । ग्रामसभेत श्रीमंत लोकांची नावे लाभार्थी यादीतून कमी करून त्याऐवजी गरजू व गोरगरीब लाभार्थयांची निवड करावी असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. एरंडोल तहसील कार्यालयात सोमवार दि.४ रोजी तालुका व नगरपालिकास्तरीय दक्षता समितीची संयुक्त बैठक आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते.

बैठकीत समितीत नव्याने निवडण्यात आलेल्या २२ नवनियुक्त सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व ओळखपत्रे वितरीत करण्यात आले. पुढे बोलतांना आ. चिमणराव पाटील यांनी, गरीब व गरजू लोकांना शासकीय योजनेचा लाभ कसा मिळेल, यासाठी दक्षता समितीच्या सदस्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे सांगितले. यावेळी परेश बिर्ला, नगरसेविका आरती महाजन, मनिषा चौधरी, चंदू जोहरी, अतुल ठाकूर, रेवानंद ठाकूर, हरेश पांडे, ज्ञानेश्वर बडगुजर, प्रवीण पाटील, कल्याणी पाटील, सुरेखा महाजन, रवि चौधरी आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक संदीप इंगळे यांनी तर सुत्रसंचालन पुरवठा अव्वल कारकून ज्ञानेश्वर राजपूत व नंदकिशोर वाघ यांनी केले. आभार तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज