गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील..,वाचा कोणी केली तोंड फोडण्याची भाषा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहे, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, यावरून आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडले आहे. गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील..अशी सडकून टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी डिवचलं होतं. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी सडकुन टीका केली.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं. गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार?


शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही. मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय,.तात्काळ गुन्हा दाखल करा..नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.. असंही त्या म्हणाल्या आहे.

खडसे यांची देखील टीका?

दरम्यान, याच टिकेवरून एकनाथराव खडसे यांनी देखील टीका केलीय. हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -