चिनावल येथे आ.शिरिष दादा चौधरी चे निधीतील विकास कामांचे भूमिपूजन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । सावदा ( प्रतिनिधी ) – सावदा येथून जवळ असलेल्या चिनावल ता रावेर येथे दिनांक ५ रोजी रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांचे निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.शिरिष चौधरी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार शिरीष चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून आज चिनावल येथील मुस्लिम वस्ती परिसरात गटारी तसेच अंतर्गत रस्ते ई विकास कामांचे भूमीपूजन झाले. या वेळी चिनावल खिरोदा गटाच्या जि प सदस्या सौ सुरेखा नरेंद्र पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे, तसेच मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष हयात खान हाजी वायद खान ,शे ईरफान ( मेंबर ) हाजी कुतुबुद्दीन ,असलम खान हाजी शब्बीर खान , माजी सरपंच दामोधर महाजन ,शि.प्र.मडळाचे चेअरमन किशोर बोरोले, अल्ताफ शेठ, नरेंद्र ( बापू ) पाटील, कमलाकर पाटील ,शे अजमल, ग्रा प सदस्य शेषराज भालेराव , संजय भालेराव सर हे या वेळी उपस्थित होते. सदर वेळी आ.शिरिष चौधरी यांनी कोरोना च्या कठीण काळातून सावरत आपल्या सरकारने हळू हळू विकास कामे करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या चिनावल येथे ही प्रत्येक विभागात कामे करण्यास आपण बांधील असल्याचे सांगितले. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी केले. सदर वेळी सर्व स्तरीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -