fbpx

Exclusive : मागवला ‘आयफोन’, मिळाला ‘चायना फोन’

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने ऑनलाइन पद्धतीने आयफोन मागविला असता खोक्यामध्ये चक्क आयफोन सारखा दिसणारा चायना फोन आल्याने त्याची भंबेरी उडाली आहे. रक्षाबंधनला बहिणीला मोबाईल भेट देण्याचे स्वप्न त्याचे हवेत विरले.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोणत्याही अधिकृत आणि नावाजलेल्या साइटवरून ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून साहित्य न मागविल्याने बहुतांश वेळी फसवणुकीचे प्रकार घडत असतात. सिंधी कॉलनी परिसरात राहणारा गौतम तेजवानी हा तरुण फुले मार्केट परिसरात चप्पल, सॅंडल विक्रीच्या दुकानावर तो काम करतो.

एक मिनिटात गौतम याने ऑनलाइन पद्धतीने १५ हजार रुपयात जुना आयफोन खरेदी केला होता. रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणीला भेट देण्यासाठी त्याने मोबाईल मागवला होता. आपल्याला सत्तर हजारांचा आयफोन स्वस्तात मिळणार असल्याने गौतम आनंदात होता. ऑनलाईन मागविलेला मोबाईल हातात पडताच त्याचा मोठा भ्रमनिरास झाला. आयफोनच्या खोक्यात निघालेला फोन आयफोन सारखा दिसत असला तरी तो चायना फोन होता.

गौतमने इंस्टाग्रामवर आलेली एक जाहिरात पहिली. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यावर त्याने मोबाईलचे फोटो पाठविले. गौतमला १३०० रुपये ऑनलाईन पाठवायला सांगत उर्वरित रक्कम मोबाईल आल्यावर द्यायचे सांगितले. जळगावातील ब्ल्यू डार्ट कुरियरमध्ये मोबाईल आल्यावर उर्वरित रक्कम गौतमने दिली आणि मोबाईल घेऊन तो घरी गेला. मोबाईल उघडताच आपण फसलो हे त्याच्या लक्षात आले.

आपली फसवणूक झाल्यावर गौतमने नंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज