चाइल्ड पोर्नोग्राफी : CBI चे जळगाव, धुळेसह देशभरात छापे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । सीबीआयच्या पथकाने ऑनलाइन बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ऐतिहासिक कारवाई करत देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७७ ठिकाणी छापे टाकून ८३ आरोपींविरुद्ध २३ गुन्हे दाखल केले. छापेमारीत जळगाव, धुळेचा देखील समावेश असून सीबीआयला इलेक्ट्रॉनिक डिवाइस आढळून आले आहेत. यातील आरोपींचे धागेदोरे हे १०० देशांची जुळले असण्याची शक्यता आहे. चौकशीत आतापर्यंत ५० हून अधिक ग्रुप आढळून आले आहेत.

सीबीआयकडून अशा प्रकरणात पहिल्यांदाच ऐतिहासिक कारवाई करण्यात आली असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या पथकाला ओडिशात विरोध करण्यात आला. ही छापेमारी बुधवारी देखील सुरू राहणार आहे. सीबीआयने मंगळवारी केलेल्या छापेमारीत ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीत ठोस पुरावे आढळून आल्यावर त्यांना अटकही केली जाणार आहे. दरम्यान, सीबीआय या प्रकरणी विदेशी नागरिकांची धरपकड आणि त्यांच्या सामील होण्याबाबत इंटरपोलद्वारे संबंधित देशांशी लवकरच संपर्क करणार आहे.

सीबीआयने महाराष्ट्रासह कुठे कुठे टाकले छापे?

सीबीआयने केलेल्या कारवाईत जळगाव, धुळे येथे देखील छापे टाकल्याने जिल्हा पुन्हा रडारवर आला आहे. दोन दिवसापूर्वीचे गांजा प्रकरण शमत नाही तोच नवीन प्रकरण उभे राहिले आहे.

उत्तर प्रदेश – जालौन, मऊ, चंदौली, वाराणसी, गाझीपूर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, नोएडा, झांसी, गाझियाबाद, मुजफ्फरनगरमध्ये छापे
गुजरात – जुनागढ, भावनगर, जामनगरमध्ये छापे
पंजाब – संगरूर, मलेरकोटला, होशियारपूर, पतियाळा
बिहार – पाटणा, सिवान
हरयाणा – यमुनानगर, पानिपत, सिरसा, हिसार
ओडिशा – भद्रक, जाजपूर, ढेंनकनाल

राजस्थान – अजमेर, झुंझुू, जयपूर, नागौर
मध्य प्रदेश – ग्वाल्हेर
महाराष्ट्र – जळगाव, धुळे, पालघर जिल्ह्यातील सलवड
हिमाचल प्रदेश – सोलन
आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्येही सीबीआयने छापे टाकले.

ऑनलाइन लैंगिक शोषणामुळे लहान मुलांना अनेक वाईट घटनांना सामोरं जावं लागतंय. ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे ही स्थिती अतिशय भयानक होते. उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे संबंध विदेशाशी असल्याचं समोर आलं. चित्रकूटमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात उत्तर प्रदेशातील इंजीनिअरला अटक केली होती.

सीबीआयने या प्रकरणी एक विशेष टीम बनवली आहे. अशा प्रकरणांवर ही टीम नरज ठेवून आहे. अशा प्रकरणांचा खोलात जावून तपास सुरू आहे. असे जवळपास ५० हून अधिक ग्रुप आहेत. ५००० हून अधिक लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत. त्यांचे संबंध १०० देशांशी आहेत. या प्रकरणांत ८० हून अधिक लोक सामील असल्याचं सीबीआयला तपासात आढळून आलं. हा ग्रुप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि थर्ट पार्टी होस्टिंग प्लॅटफॉर्मवर लिंक, व्हिडिओ, पोटो आणि पोस्टद्वारे बाल लैंगिक शोषणाचा प्रसार करत आहेत.
छाप्यांदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक डिवाइस, मोबाइल, लॅपटॉप जप्त करण्यात आले, असं सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज