सर्पदंशाने चिमुकलीचा मृत्यू; अंथरुणात आढळले २ साप

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । अंथरुणात घुसलेल्या सापाने ४ वर्षीय बालिकेला दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.१५ रोजी भोकरी (ता.पाचोरा) येथे घडली. यामुळे घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाचोरा तालुक्यातील भोकरी येथील अलिजा इमरान काकर ही चार वर्षीय बालिका आई सोबत झोपलेली असताना सोमवार दि.१५ रोजी पहाटेच्या सुमारास तिला काही तरी चावले. त्यामुळे तिला जागी झाली व तिने याबाबत आईला सांगितले. आई-वडिलांनी उठून बघितले असता अलिजाच्या अंथरुणावर दोन साप असल्याचे दिसून आले. त्यापैकी एकाने अलिजाच्या गळ्याजवळ दंश केला होता. तिच्या आई-वडिलांनी तिला तातडीने दवाखान्‍यात नेले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज