fbpx

पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बालकाचा तलावात बुडून मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । जामनेर तालुक्यातील मांडवे बु. येथे म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा तलावात पाय घसरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. अतुल अमोल विसावे (कोळी) असे मयताचे नाव आहे.

याबाबत असे की, अतुल हा गावातील शिवारात म्हशी चारण्यासाठी गेला होता. म्हशी चारून झाल्यावर तो मांडवे गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मातीबांधारावर म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेला होता. 

यावेळी अतुलचा चिखलात पाय घसरल्याने तो खोल पाण्यात जाऊन पडला. तो एकता असल्याने आजूबाजूला देखील कोणीच नसल्याने मदतीसाठी किंचाळत त्याने पाण्यातच आपला प्राण सोडला. गावकऱ्यांना ही घटना कळताच त्याला तलावातून बघेर काढून दवाखान्यात निळे असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आई वडिलांना तो एकुलताएक मुलगा होता. त्याला दोन लहान बहिणी आहेत. त्यामुळे या घटनेने त्याच्या परिवाराने एकच आक्रोश केला. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज