कुपोषणाने चिमुकल्याचा मृत्यू, महिनाभरानंतर पोलिसात नोंद

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागून असलेल्या आसराबारी वस्तीवरील आठ महिन्यांच्या बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेस महिना उलटल्यानंतर यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ महिन्यांचा कुपोषीत बालक आकाश जवानसिंग पावरा (रा.आसराबारी, ता.यावल) याचा उपचारादरम्यान 31 जुलै रोजी मृत्यू झाला होता. यानंतर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती व चौकशी पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरानंतर यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -