धक्कादायक : झोका ठरला जीवघेणा, झोक्यातून पडल्याने चिमुकलीचा अंत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । यावल तालुक्यातील भालशिव गावात एक वर्षीय चिमुकलीसाठी झोका जीवघेणा ठरला आहे. झोक्यातून पडल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील भालशिव या गावातील शिवारात गिरीष पारधी हे पत्नी आणि १ वर्षीय चिमुकली राशी हिच्यासह राहतात. झोपडीत बांधलेल्या झोक्यातून पडल्याने तिला डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबियांनी तिला तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होते. दि.२६ ऑगस्ट रोजी ५.३० वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना तिचा दुदैवी मृत्यू झाला. या संदर्भात जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल अशोक जवरे हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar