fbpx

अचानक झालेल्या भाववाढीमुळे बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । खतांच्या ५० किलाे पिशवीची किंमत सरासरी दीडपट झाल्याने बळीराजासमोरील संकट अधिक वाढले आहे. खरीपच्या पेरणीचे दिवस जवळ येत असताना रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरी ३ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर हाेत असताे. युरियासह रासायनिक खतांचा एका हंगामात सरासरी एकरी १०० ते १५० किलाे वापर हाेत असताे. म्हणजे आतापर्यन्त एकरी खतांचा खर्च एकरी २ हजार ते २३०० रुपयांपर्यंत हाेता. या हंगामात हाच खर्च ४ हजार ते ४५०० रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या ताेंडावर खतांमुळे वाढलेले बजेट शेतकऱ्यांसाठी आर्थिक बाेजा वाढवणारे आहे.

mi advt

जिल्ह्यातील शेतकरी माेठ्या प्रमाणावर डीएपी, १०:२६:२६, २०:२०:०० या सारख्या खतांचा माेठ्या प्रमाणावर वापर हाेताे. कंपन्यांनी डीएपीची किंमत ११८५ रुपयांवरून थेट १९०० रुपये केली आहे. १०:२६:२६ची किंमत ११७५ वरून १७७५ रुपये, १२:३२:१६ची किंमत ११९० वरून थेट १८०० रुपये करण्यात आली आहे. ८५० रुपयांचे पाेटॅश आता १ हजार रुपये बॅगप्रमाणे मिळणार आहे. कंपनीनिहाय खतांचा किमती कमी अधिक वाढवण्यात आलेल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज