दुसऱ्या जिल्ह्यातून येत असाल तर सावधान : जळगाव जिल्ह्यात ११ ठिकाणी तपासणी नाके

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून त्यात खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा अधिक दक्ष होत असून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रवेशाच्या ११ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातून येणाऱ्या मार्गावर देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान पाहायला मिळाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कडक पाऊलं उचलली जात आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रवेशाच्या ११ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. अत्यंत आवश्‍यक कारणासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याला अतिशय कडक नियमावली करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक कारणासोबत शासकीय मान्यताही महत्वाची आहे.

 

दरम्यान, या सीमा तपासणी नाक्यांवर ८ पोलीस कर्मचारी व एक दुय्यम अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे. प्रत्येकाची सहा तासांची ड्युटी राहणार असून चार शिफ्टमध्ये हे कर्मचारी ड्युटी करतील. म्हणजे या नाक्यावर २४ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी लागू झाल्यानंतर ३१ ठिकाणी सीमा तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात आले होते. यंदा पोलीस अधीक्षकांनी या नाक्यांची संख्या कमी करुन ती ११ वर आणली आहे. त्यातही बंदोबस्त मात्र वाढविलेला आहे.

 

दरम्यान,  जिल्ह्यातील व्यक्तीही बाहेर जाणार नाही. अतिशय गंभीर कारण असेल तरच जिल्ह्यातील व्यक्तीला बाहेर जाता येईल, त्यासाठीही ई पास घ्यावा लागणार आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले आहे.

 

या ठिकाणच्या बाॅर्डरवर केली जातेय नाकाबंदी

 

नाशिक ग्रामीण आंतरजिल्हा बाॅर्डर

पिलखोड : मेहुणबारे पो.स्टे

धुळे जिल्हा आंतर जिल्हा बाॅर्डर

गलंगी : चोपडा ग्रामीण पो.स्टे

चोपडाई : अमळनेर पो.स्टे

सबगव्हाण : पारोळा पो.स्टे.

दहिवद : मेहुणबारे पो.स्टे.

बऱ्हाणपूर आंतरजिल्हा बॉर्डर

खापरखेडा : मुक्ताईनगर

चोरवड : रावेर

पाल : रावेर

वैजापूर : चोपडा ग्रामीण

बुलढाणा आंतरजिल्हा बाॅर्डर

चिखली : मुक्ताईनगर पो.स्टे

घानखेडा : बोदवड पो.स्टे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज