पारोळा-एरंडोल मतदार यादीची पळताडणी करा : चंद्रकांत पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । पारोळा, एरंडोल मतदार संघाच्या मतदार यादीत ग्रामीण भागातील व शहरातील इतरस्त्र वास्तव्यास असलेल्या मतदारांची नावे आपल्या सोईनूसार स्थंलातर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यादीची पळताडणी आणि चौकशी करून कार्यवाही करावी. असे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पारोळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

सविस्तर असे की, निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत मतदान पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळयासमोर ठेऊन काही मंडळी पारोळा, एंरडोल मतदार संघाच्या मतदार यादीत ग्रामीण भागातील व शहरातील इतरस्त्र वास्तव्यास असलेल्या मतदारांची नावे आपल्या सोईनूसार स्थंलातर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतदार यादीची पळताडणी करून या प्रकारास आळा बसवावा व चौकशी करून कार्यवाही करावी. असे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील व मित्र परीवार यांनी पारोळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -