fbpx

चाळीसगावात जुन्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील नागद रोड भागामध्ये जुन्या वादातून पुन्हा हाणामारीची घटना घडली. तुम मुझे खुन्नस देते हो,आज मै तुम्हारा गेम बजा दुंगा. असे सांगत एकाच्या डोक्‍यात लोखंडी रॉड टाकून जबर जखमी केल्याची घटना घडली. चाळीसगाव पोलीस स्टेशनला या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी की फिर्यादी फैजान शेख मजीद (17) नागद रोड सुर्यछाप कारखान्याजवळ हा त्याच्या मित्रांसमवेत शुक्रवारी दिनांक 17 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास पीर मुसा कादरी बाबा दर्गा मध्ये नमाज पठण असलेला होता. तेथे नमाज पडण्यासाठी मोईनुद्दीन उर्फ मोया समीर शेख, समीर शेख सलीम शेख, नयूर शेख यासीन येही आले होते.

mi advt

त्यावेळी फैजान व त्याच्या मित्रांची मोईनुद्दीन उर्फ मोयाशी नजरानजर झाली. नमाज पठणानंतर मोयाने फोन करून फैजानला नागद रोडला थांबण्यास सांगितले. फैजन व त्याचा मित्र नागदरोडवरून जात असताना मोया उर्फ मोईनुद्दीन शेख हातात लोखंडी रॉड घेऊन आला व तुम ज्यादा मत गई हो, तुम मुझे क्यू खुन्नस देते हो, आज तुम्हारा गेम बजा दुंगा असे म्हणत समीर व नयुर यांनी फैजान याला धरून ठेवले. व मोयाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील लोखंडे रॉड फैजानच्या डोक्यात घातला. फैजानचा मित्र शेख मुस्तफा हा आवरण्यास आला असता समीर शेख यांनी मुस्तफाच्या डोक्यात लाकडी दंडका टाकला व इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारले. त्यावेळेस मारहाण करण्यापासून फैजान चा भाऊ व इतरांनी वाचवले. तर शिवीगाळ करीत मारहाण करणारे तिघीजण पळून गेले.

याप्रकरणी फैजान शेख मजिद याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मोईनुद्दीन उर्फ मोया समीर शेख, समीर शेख सलीम शेख, व नयुर शेख असीन यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 323, 504, 506, 34  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज