भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर अग्रवाल

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । भुसावळ येथील ऑटोमोबाइल व मसाले क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर अग्रवाल यांची भाजप उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, रमाशंकर दुबे, रेखा पाटील, गणेश माळी आदी उपस्थित होते. आगामी काळात उद्योग आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध समस्या मार्गी लावू. उद्योग, रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज