शेतकऱ्यांनो काळजी घ्या! जळगाव जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची शक्यता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । राज्यावर अवकाळी पावसाचं संकट पुन्हा घोघावत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात आज शनिवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पहाटे तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलाेमिटर प्रतितास या वेगाने साेसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उत्तर महारा‌ष्ट्रात शनिवारपर्यंतच अवकाळीची शक्यता असून मराठवा‌ड्यात ९ जानेवारीपर्यंत तर विदर्भात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे. रविवारपासून जळगाव जिल्ह्यात हवामान काेरडे असेल.

यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अगोदरच शेतकरी हैराण असताना, या दणक्याने केळी, हरभरा, गहूसह विविध पिके संकटात आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -