पुढील दोन दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, जळगावला ‘यलो’ अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । गेल्या आठवड्यापासून राज्यात परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे. या दरम्यान, आता बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळं पुढील दोन दिवसात राज्यातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज (१६ ऑक्टोबर) आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसापूर्वी हवामान खात्याकडून जिल्ह्याला १६ आणि १७ ऑक्टोबर ला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं होत.

दरम्यान, आज उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

16 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

17 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज