जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । राज्यात ऐन कडाक्याच्या थंडीत जाणवत असताना दुसरीकडे मात्र गारपीठसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज अकोल्यासह अहमदनगर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांचं या गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा व आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही काही भागात गारपीट झाल्याचं समोर आलं आहे. अकोला शहरात गारपिटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली. अकोला शहरांच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसासोबत गारपीटही झाली आहे. सकाळपासूनच अकोला शहरात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर दुपारनंतर अकोला शहरात जोरदार पाऊस झाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात आज ( 28 डिसेंबर) आणि उद्या (29 डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरलाय. मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असून महाराष्ट्रात आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांन ऑरेंज ॲलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला होता.
दरम्यान, 29 डिसेंबरला पूर्व विदर्भात ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलाय. तर चंद्रपूरला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.
हे देखील वाचा :
- महाराष्ट्रातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला; ‘या’ तारखेपासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा..
- जळगावात थंडीची चाहूल; कमाल अन् किमान तापमानात घट
- आज महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; जळगावात कसं असेल हवामान?
- ऐन थंडीत जळगाव जिल्ह्यावर पावसाचे सावट; वाचा हवामान खात्याचा अंदाज
- जळगावमधील तापमान घसरले; आजपासून असं असेल हवामान?