जळगावात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट जारी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या गुरुवारपासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain in maharashtra) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ७ जानेवारीला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडली होती. यानंतर आता राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असून राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान विविध ठिकाणी पाऊस होणार आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) येलो अलर्ट जारी केला आहे.

6 जानेवारी : धुळे,नंदुरबार
7 जानेवारी : धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर
8 जानेवारी : ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग
9 जानेवारी : मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -