fbpx

जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । केरळात निर्धारित वेळेच्या दोन दिवस उशिराने म्हणजे ३ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने आता वेगाने आगेकूच सुरू केली आहे. त्याअगोदर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात ५ ते ८ जून दरम्यान पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक केंद्राने वर्तविला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी दरम्यान असेल.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध लागले आहे. त्यानुसार यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता वेधशाळेच्या अंदाजानुसार समोर आली आहे. वेधशाळेने शुक्रवारी सायंकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांपैकी ५ ते ८ जून दरम्यान तुरळक पाऊस हजेरी लावेल.

काल शुक्रवारी संध्याकाळी जळगाव जिल्ह्यातील  बहुतांश तालुक्यांमध्ये तुरळक तर जोरदार पाऊस झाला आहे. जळगाव शहरातही काल मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, ४ जून रोजी मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापत मध्य अरबी समुद्र, उत्तर कर्नाटक व दक्षिण आंध्रच्या काही भागापर्यंत मजल मारली. मान्सूनचा वेग असाच राहिला तर येत्या २-३ दिवसांत मान्सून तळकोकण व द. महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. पुणे ‌वेधशाळेनुसार, दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी ५ ते ८ जून या काळात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज