fbpx

मध्य महाराष्ट्रासह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्र तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील चक्रिय चक्रावात यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार, २५ ते २८ मे या काळात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पारा चाळिशीपार राहिला. सोमवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सियस तापमान नोंदण्यात आले.

दरम्यान, काल सोमवारी जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. या मुळे शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले आहे. धरणगाव, एरंडोल, पहूर, पाचोरा आदि भागात वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आता  ‘यास’ चक्रीवादळमुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज