केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव(प्रतिनिधी) देशातील सर्वातमोठ्या विरोधी पक्षाचे नेते काँग्रेस चे राहुल गांधी यांना “सांड” म्हणत बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पुतळ्यास महिला काँग्रेस शहर अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन आज रोजी सकाळी 11वाजता तहसील कचेरीच्या आवारात करण्यात आले. आणि दानवेंच्या या वक्तव्याचा तीव्र निषेधव्यक्त करण्यात आला. तसेच या आंदोलनानंतर तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी चाळीसगाव शहर महिला काँग्रेस कमिटी. युवक काँग्रेस मधू गवळी,प्रज्वल जाधव. सेवादल आर डी चौधरी. शेतकरी काँग्रेस एम एम पाटील. अनुसूचित जाती विभाग सोमनाथ मोरे अल्पसंख्याक विभाग समीर शेख इ. उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -