चाळीसगावात पोलिस स्टेशनला कोंबड्या जमा करत शिवसेनेचा निषेध, नारायण राणेंचा पुतळाही जाळला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । महाड येथे जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलताना बेजबाबदार व  मुख्यमंत्र्यांचा सार्वजनिक अपमान करणारे वक्तव्य केल. या चिथावणीखोर वक्तव्याची दखल घेऊन आपण नारायण तातोबा राणे यांच्यावर तातडीने भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ५०५ (२), १५३ ब(१)(क) खाली गुन्हा दाखल करावा. तशी प्रथम खबर अहवालाची प्रत आम्हाला द्यावी व आरोपी नारायण तातोबा राणे यांना अटक करून त्याच्यावर कारवाई करावी. अशी मागणी चाळीसगाव शिवसेनेतर्फे करण्यात अली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, भिमराव खलाने, तुकाराम पाटील, संजय संतोष पाटील ,उपशहर प्रमुख शैलेंद्र, सातपुते मुराद पटेल, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी ,दिलीप देवराम पाटील, अनिल पाटील, नकुल पाटील, अल्पसंख्यांक शहरप्रमुख वशीम, चेअरमन जावेद शेख, आण्णा पाटील, हिम्मत निकम, अजिज मिर्झ, शुभम राठोड, सुभाष राठोड, दिनेश घोरपडे, दिलीप राठोड, अशोक बोराडे, सोमनाथ साळुंखे, आशिश सानप, सागर पाटील, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -