⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगावचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील नियंत्रण कक्षात

चाळीसगावचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील नियंत्रण कक्षात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचार्‍यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षात जमा केले आहे. या कारवाईने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहर पोलिस ठाण्याचा कारभार तात्पुरता ग्रामीणचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, निरीक्षक पाटील यांची हे तात्पुरत्या स्वरूपातील बदली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एका विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह दोषारोपपत्र लवकर न्यायालयात सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागून चार हजारात तडजोड करून ती स्वीकारल्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे (वय 52, रा. वैष्णवी पार्क, चाळीसगाव) व पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील (वय 38, रा. चाळीसगाव) यांना मंगळवार, 28 जून रोजी जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली होती.

आरोपींची दुसर्‍या दिवशी जामिनावर सुटकादेखील झाली मात्र लाच प्रकरणात पोलिस खात्याची पुरती बदनामी झाल्याने सर्वसामान्यांमधून पोलिस दलाविषयी रोषही व्यक्त झाला होता. कर्मचार्‍यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका निरीक्षकांवर ठेवत त्यांची शुक्रवारी तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी दिली. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार ग्रामीणचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, निरीक्षकांना कंट्रोल अ‍ॅटॅच केले असलेतरी ही बदली तात्पुरता असल्याची माहिती आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह