fbpx

हद्दच झाली राव..! चोरट्यांनी पोलीस कॉन्स्टेबल घरातून लांबविला सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । चाळीसगावमध्ये चोरट्यांनी हद्द केली आहे. चोरट्यांनी शहर पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दिपक रावसाहेब जगताप यांच्या घरात चोरी केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे.

दिपक जगताप हे धुळे येथे नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी जात असताना घराला कुलूप लावून त्याची चावी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांचेकडे दिली होती. २६ रोजी रात्री घरी परत आल्यावर जगताप यांना घराचे दार उघडे दिसले. कुलूप बाहेर भिंतीवर ठेवलेले होते. घरातील लाकडी कपाटाचे दरवाजेही उघडे होते.

असा गेला मुद्देमाल?

या कपाटातील एक लाख ६८ हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किंमतीची चार ग्रॅम कानातील टॉप्स, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची चेन असा एकूण २ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

गुन्हा दाखल

यावेळी एकाकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांच्यावर जगताप यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीसात दिपक जगताप यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज