fbpx

चाळीसगावातील भयभीत मेडीकल व्यावसायिकांनी घेतली खा.उन्मेश पाटलांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । चाळीसगाव शहरातील एकामागे एक चार मेडिकलवर चोरीच्या घटनेने मेडिकल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या कोरोना महामारीत रांत्रदिवस काम करणारे मेडीकल व्यावसायिक कोरोनायोद्धा आहेत. चोरीच्या घटनेने त्यांचे मनोबल खच्चीकरण झाले असून पोलीस प्रशासनाने अतिरिक्त तपास अधिकारी नेमावा. येत्या तीन दिवसांत मुद्देमालासह आरोपींना अटक करा. अशी मागणी वजा आदेश आज खासदार उन्मेश पाटील यांनी पोलीस प्रशासनास दीले आहे.

शहरातील मेडीकल व्यावसायिकानी आज खासदार उन्मेश दादा पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाशी खासदार उन्मेश पाटील यांनी सदर आदेश दिले.

mi advt

याप्रसंगी चाळीसगाव मेडिकल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव प्रेमसिंग पवार , उपाध्यक्ष विनोद जैन, सहसचिव एकनाथ पाटील, कार्यकारी सदस्य मंगेश महाजन, योगेश येवले, प्रशांत मालू, पुष्पाताई चौधरी, संजय ब्राह्मण कार, संजय वाघ, संदीपभाऊ बेदमुथा, वसंतराव चव्हाण, योगेश येवले यांच्यासह अनेक मेडिकल व्यवसायिक बांधव तसेच माजी उपनगराध्यक्ष पंडीतआण्णा चौधरी उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पोलिस अधीक्षक तसेच स्थानीक पोलीस प्रशासनाशी संपर्क करीत केमिस्ट बांधव “कोरोना योद्धा” असून  एकाच वेळी चार घटना घडल्याने घाबरला आहे.रात्रीच्या गस्त  वाढवून  येत्या तीन दिवसात चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी अतिरिक्त तपास अधिकारी नेमावा. मुद्देमालासह आरोपींना अटक करावी. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी केली. यावेळी चाळीसगाव मेडीकल डीलर्स असोशीएशनच्या वतीने खासदार उन्मेश दादा पाटील यांना  निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज