fbpx

चाळीसगावात वकीलाचे घर फोडले, ४४ हजारांचा ऐवज लंपास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव येथील वकील असलेले नानकर हे कुटुंबासह भाचीच्या साखरपुड्याला गेलेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटातून सोन्याच्या दागिन्यासह रोकड एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

चाळीसगाव येथील जुना गवळीवाडा परिसरात संजय विनायक नानकर (वय-५४) हे परिवारासह वास्तव्यास असून वकीली व्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह ते करीत असतात. दरम्यान, भाचीचा साखरपुडा असल्याने नानकर हा परिवारासह १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून जळगाव येथे गेला. त्यानंतर तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर नानकर परिवार हे १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घरी परतले. त्यावेळी घराच्या मागील मुख्य दरवाजाचे कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावर संजय नानकर यांनी घरातील बेडरूममधील लाकडी कपाटाची पाहणी केली असता १५ हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅमची अंगठी, १५ हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅमचे कानातील कर्णफुल, ९ हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅमचे क्रिस्टल कर्णफुल, ३ हजार रुपये किंमतीचे पाच चांदिचे जोडे व २ हजार रुपये रोखड असे एकूण ४४ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. संजय नानकर यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज