चाळीसगाव-औरंगाबाद रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण, रेल्वे बोर्डाकडे अहवाल सादर करणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव-औरंगाबाद व-जळगाव-औरंगाबाद-जालना या प्रस्तावित रेल्वे लाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून रेल्वे लाईनचा मार्चपर्यंत अहवाल सादर करण्यात येईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यातील कोरोना अद्याप संपलेला नसल्याने तूर्त पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येणार नाहीत. मात्र राज्य शासनाने याबाबत परवानगी दिल्यानंतर मुंबई लोकल च्या धर्तीवर पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांनी दिली.

लाहोटी म्हणाले की सध्या मध्य रेल्वे ताशी 110 वेगाने एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात असल्या तरी वर्षभरात इगतपुरी-भुसावळ-भुसावळ-बडनेरा-भुसावळ-खंडवा या मार्गांवर ताशी 120 ते 130 वेगाने एक्सप्रेस गाड्या चालविण्याचे नियोजन आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज