fbpx

जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील करगांव तांडा येथील २२ वर्षीय तरूणाने जुन्या वादाच्या कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समजते. दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील करगाव तांडा क्र.३ येथील प्रविण नारायण जाधव (वय-२२) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ८:१५ वाजता उघडकीस आली होती. दरम्यान मयताचा भाऊ अरविंद नारायण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रविण नारायण जाधव व उमेश पांडुरंग राठोड, राकेश पांडुरंग राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड यांच्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाली होती. तेव्हापासून उमेश पांडुरंग राठोड, राकेश पांडुरंग राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड या चौघांकडून प्रविण नारायण जाधव यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे जुन्या वादाच्या कारणावरूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे आरोप घरच्यांनी केले आहेत. भाऊ अरविंद नारायण जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज