चाळीसगावात पुन्हा महापूर ; अनेक गावांचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख ।  गेल्या काही दिवसापासून चाळीसगाव परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. तसेच नद्यांपरिसरातील सर्व धरणे देखील पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहेत. आणि काल अचानक नदीपरिसरतील भागात जोरदार पाऊस झाल्याने काल दुपारपासून नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. आणि सायंकाळनंतर या पाणी पातळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ बघण्यास मिळाली आणि बघता बघता रात्री बारा वाजेपर्यंत पुन्हा तितुर व डोंगरी नदीला महापूर आला. नदी दुथडी भरून वाहू लागली. नगरपालिकेने नदीपरिसरातील लोकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिलेला होता. तसेच पूर आल्यानंतर सुद्धा सर्व लोकप्रतिनिधींनी रात्री उशिरा महापूराची पाहणी केली.

चाळीसगाव तालुक्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे पहिल्या महापुराराला आला आठ दिवससही होत नाही तोपर्यंत दुसरा महापूर लोकांना पाहायला मिळाला. पण सर्व यंत्रणा सतर्क असल्याने आणि नगरपालिका प्रशासनाने तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी लोकांना सतर्कतेचा इशारा दिल्याने मोठ्या प्रमाणावर हानी टळली.

नदीला पुन्हा महापूर आल्याने चाळीसगाव परिसरातील नद्यांच्या पुलावरून तसेच ग्रामीण भागातील काही नद्यांच्या पुलांवरून पाणी ओसंडून वाहत होते. चाळीसगाव परिसरातील बऱ्याच गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तसेच भाजी मार्केट आणि अन्य बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. काल रात्री उशिरापर्यंत माननीय आमदार, खासदार, महसूल अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव पूर परिस्थितीची पाहणी करत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -