‘त्या’ पोलिसांचे आज निलंबन होणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । औट्रम घाटात गुरुवारी रात्री चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी पैसे वसुली करताना दिसले होते. पोलीस चौकशीत ४ पोलिस कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर आज निलंबनाची कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले आहे. चाळीसगावच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठवला आहे.

काय आहे प्रकरण?

चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या औट्रम घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खात्री करण्यासाठी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाने वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत औट्रम घाटात नेला.

त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. त्यानतंर मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला.

या घटनेबाबत आमदार चव्हाण यांनी तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी शुक्रवारी अहवाल सादर केला. त्यात ४ कर्मचारी दोषी असल्याचे नमूद केले. रात्री उशिरापर्यंत निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनीही या माहितीला दुजोरा दिला असून आज कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -