fbpx

चाळीसगाव तालुक्यात तरुण शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव- तालुक्यातील भोरस शिवारात शेतातील शेडच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन ३५ वर्षीय तरूणाने जीवन संपवले . आत्महत्येचे कारण समजून आले नाही . चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या घटनेची माहिती अशी की , प्रदीप अर्जुन पाटील ( ३५ ) रा . भोरस ता . चाळीसगाव हा तरूण गुरुवार दि .१९ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या पूर्वी भोरस बुद्रूक शिवारातील त्याच्या शेतातील शेडमधील अँगलला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला . त्याच्या आत्महत्येचे कारण समजून आले नाही . याप्रकरणी प्रदीप धनराज पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . तपास हवालदार दत्तात्रय महाजन हे करीत आहेत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज