मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती ; वेतन 64,000 रुपये मिळणार

Central Railway Bhusawal Recruitment 2021

मध्य रेल्वे भुसावळ विभाग येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

१) सुपर स्पेशालिस्ट

२) स्पेशलिस्ट

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सुपर स्पेशालिस्ट : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना दहा ते बारा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

स्पेशलिस्ट : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

सुपर स्पेशालिस्ट- वय वर्षे 30 – 64 दरम्यान

स्पेशलिस्ट- वय वर्षे 30 – 64 दरम्यान

इतका मिळणार पगार

सुपर स्पेशालिस्ट:  64,000/- रुपये प्रतिमहिना

स्पेशलिस्ट : 52,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

१. Resume (बायोडेटा)

२. दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

३. शाळा सोडल्याचा दाखला

४. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

५. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

६. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ ई-मेल आयडी : [email protected] / CMS कार्यालयात, विभागीय रेल्वे रुग्णालय भुसावळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज