रेल्वे प्रवाशांनो लक्ष्य द्या ! आजपासून धावतील ‘या’ उत्सव विशेष गाड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहे. यात आरक्षण असलेल्यानाच प्रवास करता येत आहे. दरम्यान,सणासुदीचे दिवस सुरु असून प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दिवाळी व छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेकडून ३६ उत्सव विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे. यामुळे प्रवाशांची जागेसाठी हाेणारी गैरसाेय दूर हाेणार आहे.

गाडी क्रमांक ०१२३५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी ( आठ फेऱ्या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २ ते २३ नोव्हेंबर पर्यंत दर मंगळवारी दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. विशेष साप्ताहिक गाडी दर गुरुवारी गोरखपूर येथून पहाटे ४.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष अतिजलद साप्ताहिक (8 फेऱ्या)

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ५ ते २६ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी दुपारी १.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५० वाजता गोरखपूरला पोहोचेल. विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी दर शनिवारी रात्री ९.१५ वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर विशेष अतिजलद (6 फेऱ्या) गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल. विशेष अतिजलद साप्ताहिक समस्तीपूर येथून

दर बुधवारी सकाळी ७.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-भागलपूर विशेष अतिजलद साप्ताहिक (६ फेऱ्या)गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि भागलपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.२५ वाजता पोहोचेल.

विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी भागलपूर येथून दर बुधवारी सकाळी १० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता पोहोचेल. पुणे-बनारस विशेष अतिजलद साप्ताहिक (६ फेऱ्या)

गाडी १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी पुणे येथून रात्री ८.५० वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.१० वाजता पोहोचेल. विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी दर बुधवारी रात्री १.१० वाजता बनारस येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल.

मेमूसाठी सूचनाच नाहीत : डीआरएम
भुसावळ येथून सुरू हाेणाऱ्या पॅसेंजर गाड्यांची जागा ही आता मेमू गाड्या घेत आहे, त्यासाठी भुसावळ रेल्वे यार्डात नवीन मेमू गाड्या येऊन उभ्या आहेत. पहिल्या टप्यात खंडवा, बडनेरा व देवळाली या तीन ठिकाणी मेमू गाडी सुरू केल्या जाणार आहे. रेल्वे यंत्रणा तत्पर झाली असून राज्य सरकारने गाड्या चालवण्याच्या सूचना केल्यावर तत्काळ मेमू गाड्या सुरू केल्या जाणार आहे, अशी माहिती डीआरएम एस.एस. केडिया यांनी दिली.

हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करावी
हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी काय अडचण आहे, याबाबत माहिती घेतली जाईल, असे डीआरएम केडीया यांनी सांगितले. ही गाडी सुरू झाल्यास प्रवाशांना लाभ मिळेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज