जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । यावल शहरातील साने गुरुजी विद्यालय आवारात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावर बंदी करण्यात आली. सध्या सहामाही परीक्षा सुरू असून परीक्षा काळात शाळेच्या आवारात मोबाईल कुणीही आणू नये या करीता स्वत: मुख्याध्यापकांनी गेटवर थांबून विद्यार्थ्यांची तपासणी करीत मोबाईल ताब्यात घेतले व परत जातांना विद्यार्थ्यांना परत केले. यापुढे कुणीही मोबाईल आणू नये, अशा सुचना देण्यात आल्या.
यावल शहरात नगरपरीषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून या विद्यालयात शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात व सद्या शाळेत इयत्त पाचवी ते बारावी दरम्यानच्या सहामाही परीक्षा सुरू आहे. परीक्षा काळात कुणीही शाळेच्या आवारात मोबाईलचा वापर करणार नाही या करीता शाळेचे मुख्यध्यापक एम.के.पाटील यांनी स्वत:हा विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात प्रवेश देण्यापुर्वी मुख्य प्रवेशव्दारावर तपासणी केली व विद्यार्थ्यांकडे मिळून आलेले मोबाईल ताब्यात घेत परीक्षा कालावधीत कुणीही मोबाईल आणू नये, अशा सूचना केल्या व पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाईल परत करण्यात आले.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांना शिस्त लागावी याकरीता सक्तीने मोबाईल वापरावर शाळेच्या आवारात बंदी करण्याचा निर्णय शाळेने घेतला आहे. या करीता मुख्याध्यापक एम.के.पाटील, उपप्राचार्य ए.एस. इंगळे, पर्यवेक्षक व्ही.टी.नन्नवरे, पी.एन. सोनवणे, रुपाली चोपडे, व्ही.ए.काटकर, प्रा.पी.जी.बडगुजर, कार्यालयीन अधीक्षक नितीन बारी, डी.एस.फेगडे, पी.एन.सोनवणे सह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.