fbpx

सावदा येथे लिंगायत कोष्टी समाजातर्फे महात्मा बसेश्वर जयंती साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । कोरोना काळाच्या परिस्थितीमुळे समता नायक – महात्मा बसवेश्वर जयंती दी 14 रोजी लिंगायत कोष्टी समाजतील युवकांनी एकदम साध्या पद्धतीने साजरी केली  यात कोरोना बाबतचे सर्व नियम काटेकोर पाळून जयंती साजरी करण्यात आली.

येथील कोष्टी समाज मंदिरात ह.भ.प. अनिल कानडे यांच्या हस्ते बसवेश्वरांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.  यावेळी अनिल कानडे यांनी बसवेश्वरांच्या कार्याचे महत्व सांगीतले. अनुभव मंडपा द्वारा समाजात समता उभी राहील यासाठीचे कार्य केले – अनुभव मंडप म्हणजे एक प्रकारची लोकसांसद यात स्त्रियाचाही सहभाग होता बाराव्या शतकात त्यांनी आंतर जातिय विवाह करवून समाजा समोर आदर्श ठेवला असे  प्रतिपादन याप्रसंगी केले.

mi advt

या कार्यक्रमास संजय गरुडे, विकास बावने, प्रशांत सरोदे, कौस्तुभ बाबने, कैलास लवंगडे, सुभाष बारघरे, सुनील उमराने, संजू गरुडे, आदी मोजके तरुण उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज