fbpx

अंतुर्ली येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा झाला.

याप्रसंगी अंतुर्ली गावच्या सरपंच सौ.सुलभाताई शिरतुरे, पोलीस पाटील किशोरभाऊ मेढे, वाचनालयाचे अध्यक्ष श्री.एस.ए.भोईसर, भाऊराव महाजन यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच यावेळी राजेंद्र शिरतुरे, माजी मुख्याध्यापक बी.एस.वानखेडे सर,अशोक भाऊ सपकाळ,जगन्नाथ पाटील, शेख शाकीर,पंकज पाटील,विठ्ठल महाजन,नामदेव भोई, शेख भैय्या शेख करीम, चंद्रकांत केशव तायडे,कल्पेश राजू उबाळे,आकाश ज्ञानेश्वर उबाळे, दीपक रामदास शेलार,ईश्वर भास्कर शेलार,सुखदेव पाटील, हितेश पाटील, जितेंद्र मेढे, काशिनाथ महाजन,तसेच मातंग समाज बांधव व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व वाचक उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी हितेश पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर भाषण केले, हितेश पाटील याने त्यांचे तैल चित्र तयार केले व चित्राला वाचनालयास सप्रेम भेट दिले हितेश पाटील यास गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुखदेव पाटील(धुरखेडे) यांनी वाचनालयास अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट दिली.

वाचनालयाचे अध्यक्ष भोईसर यांनी मनोगत व्यक्त केले, लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रा बद्दल माहिती सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक अनिल वाडीले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल मधुकर वानखेडे, लिपिक अनिल न्हावकर, शांताराम महाजन भानुदास टेलर यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज