यावल येथे कांशीराम साहेब यांचा १५ वा परिनिर्वाण दिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुरेश पाटील । डी.एस.फोर, बामसेफ व बी.एस.पी.चे संस्थापक कांशीरामजी साहेब यांचा १५ वा परिनिर्वाण दिवस यावल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमांस निळे निशाण संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास भास्कर, रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, निळे निशाण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे, संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष विशाल तायडे, शाखा अध्यक्ष भूषण संपकाळे, कैलास लोहार, ए.के. तायडे, विष्णू लोखंडे, राजू अडकमोल, भरत अडकमोल, विवेक तायडे, अविनाश भास्कर, अशोक मच्छिवाले, किशोर अडकमोल, सागर गजरे, राहुल गजरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले तर आभार विलास भास्कर यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज