यावलात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकी संघ यावल येथे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

दरम्यान, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि जेष्ठ काँग्रेस नेते हाजी शब्बीरसेठ आणि इंटककचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भगतसिंग पाटील यांचा तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे माजी चेअरमन नितीन चौधरी, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, शहराध्यक्ष कदिर खान, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा वाढोदे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, अत्रावल सरपंच मोहन बाविस्कर, प्रा.जि.पी. पाटील सर, पुंडलिक भाऊ बारी, अनिल भाऊ जंजाळे, हाजी गफ्फार शाह, जेष्ठ नगरसेवक गुलामरसूल मेंबर, मनोहर सोनवणे, संदेश पाटील, नगरसेवक समीर मोमीन, असलंम मेंबर, समीर खान, फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, नईम शेख, इखलास सय्येद, रहेमानभाई खाटीक, माजी नगरसेवक कालु मास्टर, विक्की गजरे, अशोक पाटील, विक्की सोनवणे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -