सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात सावित्री बाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक सी.बी.अहिरे, प्रविण महाजन, पर्यवेक्षक बी.आर.खंडारे व सर्व शिक्षक उपस्थित होते. तर स्वरा फेगडे तसेच मुख्याध्यापक सी.बी.अहिरे व सावित्रीबाईच्या वेशभूषा साकारलेल्या दिव्या पाटील, सृष्टी पाटील व प्रांजल नेरकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

दरम्यान, रेवती साळुंके, खुशी पाटील व भूमिका खंडारे यांनी सावित्रीबाईच्या बालपणाच्या गोष्टी सांगितल्या तर मुख्याध्यापक प्रविण महाजन व माध्यमिक विभागात टी.टी.सोनवणे यांनी सावित्री बाईच्या जीवन कार्य बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.

सूत्र संचालन तूषार रंधे व अनिल चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन स्वाती रोटे व आशा इसाने यांनी केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -