शेळावे येथे किसान दिन साजरा‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ ।‎ पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक‎ येथे २३ रोजी किसान दिवस साजरा‎ करण्यात आला. या कार्यक्रमाला‎ झुआरी ॲग्रो केमिकल्सचे जिल्हा‎ प्रतिनिधी किरण शेळके, कृषी‎ विज्ञान केंद्राचे डॉ. दिनेश पाटील,‎ शेळवे येथील पंचायत समितीचे‎ माजी उपसभापती दीपक पाटील,‎ माजी सरपंच मधुकर पाटील,‎ तलाठी आदींची प्रमुख उपस्थिती‎ ‎ होती.

यावेळी डॉ.दिनेश पाटील‎ यांनी कापूस पिकात कीड‎ व्यवस्थापन, रासायनिक खतांचा‎ संतुलित वापर याबाबत मार्गदर्शन‎ केले. झुआरी ॲग्रोचे व्यवस्थापक‎ किरण शेळके यांनी माती परीक्षण,‎ खत खरेदीसाठी आधार कार्डचा‎ वापर आणि कंपनीच्या‎ उत्पादनांबद्दल माहिती दिली.‎ कार्यक्रमास शेतकऱ्यांची उपस्थिती‎ होती. या वेळी अन्य विषयांवर ही‎ मार्गदर्शन करण्यात आले.‎

हे देखील वाचा :


बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -